Tarun Bharat

अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या मुंबईतील राजगड या मध्यवर्ती कार्यालयाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित ठाकरे गेल्या काही वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय होते. मात्र, त्यांच्याकडे पक्षाने कोणतेही पद किंवा जबाबदारी सोपवली नव्हती. आता त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुन मनसेने महापालिकेसाठी कंबर कसल्याचे दिसून येते.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्त्व केले होते. आता अमित ठाकरे यांनाही हीच किमया साधता येणार का, हे पाहावे लागेल.

Related Stories

‘वाडिया’ रुग्णालयाचा आज फैसला

prashant_c

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार

Archana Banage

कोपार्डे येथे मरकज कार्यक्रमातील तरुण आल्याने तणाव

Archana Banage

शिवसेना-भाजपमध्ये राडा

Archana Banage

बांधकामे वाचवण्यासाठी मिळकतधारकांची धावपळ

Patil_p

स्वतंत्र पाटबंधारे खाते अन् 80 हजार एकर जमिनीला पाणी !

Abhijeet Khandekar