Tarun Bharat

अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाग्रस्तांची संख्या हजारच्या वर पोहचली आहे. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोनाची टेस्ट करून घेतली आहे. 


सुदैवाने अमित देशमुख यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला, ताप आल्याने अमित देशमुख यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय शिक्षा संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाची चाचणी करून घेतली. 


अमित देशमुख म्हणाले, मी वैद्यकीय मंत्री असल्याने आपल्याला लागण झाल्यास इतरांनी प्रादुर्भाव होऊ नये, कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून मी टेस्ट करून घेतली. 


पुढे ते म्हणाले, आता माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. अजून चार दिवस मी घरातूनच काम करणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम करेन, असं ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

दिल्ली : मागील 6 दिवसात एक लाखपेक्षा अधिक कोरोना चाचण्या; संक्रमण दरात 10 टक्के घट

Rohan_P

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

datta jadhav

दहावीचा निकाल २० जुलैला – सीबीएसई बोर्डाचा निर्णय

Abhijeet Shinde

हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय: कुमारस्वामी

Abhijeet Shinde

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर दगडफेक

Abhijeet Shinde

गोवा शिवसेनेकडून नऊ उमेदवारांची घोषणा

Sumit Tambekar
error: Content is protected !!