Tarun Bharat

अमित रोहिदासकडेच नेतृत्व, नीलमचे पुनरागमन

Advertisements

इंग्लंड हॉकी संघाचे आगमन, 2-3 रोजी होणार प्रो लीग सामने

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

इंग्लंडविरुद्ध होणाऱया एफआयएच प्रो लीग दुहेरी सामन्यांसाठी 22 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अमित रोहिदासकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले तर नीलम संजीप झेसने पुनरागमन केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ढाक्यात झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नीलम भारतीय संघाचा सदस्य होता. त्या स्पर्धेत भारताने पाकचा 4-3 असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले होते. वरुण कुमारच्या जागी त्याला घेण्यात आले असून आधीच्या संघातील हा एकमेव बदल करण्यात आला आहे. प्रो लीगमध्ये रोहिदासच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अर्जेन्टिनाकडून शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला व परतीच्या सामन्यात 4-3 असा विजय मिळविला होता. ‘युवा खेळाडूंना संधी दिल्याचा फायदा होत असून त्यांच्यातील क्षमता प्रो लीगमधील सामन्यातून दिसून येत आहे. आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत, हे आपल्यासाठी चांगले लक्षण आहे. या सामन्यांतून आम्ही विविध कॉम्बिनेशन्स आजमावून पाहत आहोत. इंग्लंड संघात अनेक गुणवान खेळाडू असल्याने दोन्ही सामने रोमांचक होण्याची अपेक्षा आहे,’ असे भारताचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारतीय संघ 8 सामन्यांतून 16 गुणांसह दुसऱया स्थानावर असून जर्मनी 17 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन, फ्रान्सविरुद्ध एक सामना जिंकला तर फ्रान्सने एका सामन्यात भारताला हरविले. त्यानंतर स्पेन व अर्जेन्टिनाविरुद्धही एक सामना गमविला व एक जिंकला आहे.

इंग्लंडचे हॉकी संघाचे आगमन

इंग्लंडच्या पुरुष हॉकी संघाचे मंगळवारी रात्री भुवनेश्वरमध्ये आगमन झाले. 2 व 3 एप्रिल रोजी हे सामने कलिंगा स्टेडियमवर होणार आहेत. ‘या मैदानावर भारताविरुद्ध खेळण्यास आपला संघ आतुर झाला असून भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आपल्या संघासमोर मोठे आव्हान असेल. आपल्या संघातील काही खेळाडूंनी याआधी या मैदानावर खेळण्याचा अनुभव घेतला आहे. पण अनेकजण येथे पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे तेही येथे खेळण्यास उत्सुक झाले असून लढती अटीतटीच्या होतील, अशी अपेक्षा आहे,’ असे इंग्लंड संघाचे प्रमुख प्रशिक्षक झॅक जोन्स म्हणाले.

भारतीय संघ ः गोलरक्षक-पीआर श्रीजेश, कृष्ण बहादुर पाठक. बचावफळी-सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, नीलम संजीप झेस, अमित रोहिदास (कर्णधार), जुगराज सिंग. मध्यफळी-जसकरण सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, निलकांता शर्मा, शमशेर सिंग, राज कुमार पाल, सुमित, विवेक सागर प्रसाद. आघाडी फळाr-गुर्जंत सिंग, मनदीप सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, गुरसाहिबजित सिंग, शिलानंद लाक्रा. राखीव खेळाडू-सुरज करकेरा, मनदीप मोर, दिप्सन तिर्की, गुरिंदर सिंग, संजय, आकाशदीप सिंग, एम.रबिचंद्र सिंग, आशिष कुमार टोपनो, मोहम्मद राहुल मौसीन, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंग.

Related Stories

युवेंट्सच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल

Omkar B

श्रेयस अय्यरकडे केकेआरचे नेतृत्व

Patil_p

सौरभ चौधरीला सुवर्णपदक

Patil_p

रशियन पुरूष स्कल्स संघाची ऑलिंपिक स्पर्धेतून माघार

Patil_p

जोकोविच, व्हेरेव्ह, सित्सिपस उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

गोविंद उपउपांत्यपूर्व फेरीत, निशांत दुसऱया फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!