Tarun Bharat

अमी मोदीला इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

बँक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला भारतातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. 

2019 मध्ये अमी मोदीला अमेरिकेत पाहण्यात आले होते. सध्या ती कुठे आहे, याबाबतची माहिती तपास यंत्रणांकडे उपलब्ध नाही. तिचा शोध घेण्यात येणार आहे.

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झाला होता. मागील वर्षी मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. तो  सध्या लंडनमधील वन्डस्वर्थ कारागृहात बंद आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने त्याच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. नीरव विरोधात भारतात प्रत्यार्पण करण्याचा खटलाही सुरू आहे.

Related Stories

गुलबर्ग्यात कोरोनाचा आणखी एक बळी

Patil_p

इलेक्ट्रिक कार्सवर 1 लाख रुपयांची सूट

Amit Kulkarni

टीव्ही अँकर रंजन यांना मिळाला दिलासा

Patil_p

शेतकरी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Patil_p

सार्वभौमत्वाशी कदापिही तडजोड नाही

Patil_p

काँग्रेस केंद्र सरकारला घेरणार

datta jadhav
error: Content is protected !!