Tarun Bharat

अमूलचे हळदी पाठोपाठ तुळशी-आलेयुक्त दूधही बाजारात

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

कोरोनाच्या कालावधीत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली जात आहेत. यामध्ये आयुष मंत्रालयाने विविध वनस्पतींचा काढा घेण्याची सूचना सरकारने केली आहे. हीच बाब लक्षात घेत प्रसिद्ध अमूल डेअरीने सध्या तुळशी आणि आलेयुक्त दूधाची उत्पादने बाजारात आणली आहेत.

सदरचे उत्पादन हे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मोठय़ा प्रमाणात उपयोगी पडणारे असल्याचा दावा कंपनीकडून केला जात असून हे उत्पादन आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले आहे. या अगोदर एप्रिलमध्ये अमूलने हळदीचे दूध बाजारात आणले आहे. हळद दूधाची 200 मिलीची बाटली सादर केली असून याची किंमत 30 रुपये ठेवली आहे. विषाणूशी लढण्याची क्षमता वाढविण्यासाठी गोल्डन दूध उपयोगी पडत असल्याचेही म्हटले आहे. मदर डेअरीनेही याच प्रकारची सर्व उत्पादने सादर केली होती.

कोविड संकटाच्या वाढत्या भीतीमुळे ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात हळद दूधाची मागणी होत होती. यामुळे अमूलने आले आणि तुळशीयुक्त दूध बाजारात आणले असल्याची माहिती अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी  दिली. हे दूध पूर्णतः आयुर्वेदिकचा आधार घेत तयार केले आहे. यामुळे या दूधाचा वापर सर्व वयोगटातील लोकांना होणार असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

भेलला मिळाली 10 हजार कोटीची ऑर्डर

Patil_p

जुलैमध्ये रत्ने-आभूषणांची निर्यात 38 टक्क्यांनी घटली

Patil_p

लाइफबॉयच्या मासिक जागतिक उत्पादनात वाढ

Patil_p

लक्ष्मी ऑरगॅनिकचा आयपीओ 15 मार्चला

Patil_p

रद्द विमान प्रवासाचे पैसे ग्राहकांना परत

Patil_p

टाटा पॉवरला मिळाला मोठा प्रकल्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!