Tarun Bharat

अमृतसर मेडिकल कॉलेजला मिळाली प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याची परवानगी

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून पत्राद्वारे अमृतसरमधील सरकारी मेडिकल कॉलेजला प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोना रुग्णांचे उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आगामी काही दिवसात या प्लाझ्मा थेरपीद्वारे इथे उपचार सुरू केले जातील, अशी माहिती चिकित्सा शिक्षा आणि संशोधन मंत्री ओम प्रकाश सोनी यांनी दिली. 


पुढे ते म्हणाले, सरकारी मेडिकल कॉलेज अमृतसर प्लाझ्मा थेरपीद्वारे कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी पहिल्यापासून तयारी करत असून आगामी काही दिवसात या थेरपीद्वारे उपचारांना सुरुवात होईल. अमृतसर मेडिकल कॉलेजकडे या उपचारांसाठी लागणारी सर्व उपकरणे, रुग्ण व प्लाझ्मा डोनर देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या थेरपीद्वारे उपचार करण्यास अमृतसर मेडिकल कॉलेज पूर्णपणे सक्षम आहे. 


पुढे ते म्हणाले, याआधी आयसीएमआरद्वारे नॅशनल क्लिनिकल ट्रायलच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी मेडिकल कॉलेज फरीदकोटला देखील प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याची परवानगी दिली होती आणि या थेरपीद्वारे उपचार करणारे हे कॉलेज देशातील एक अग्रेसर संस्थान बनले होते. या कॉलेजचे प्लाझ्मा थेरपीचे परिणाम उत्साहजनक आहेत. 


या थेरपी अंतर्गत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा स्टोअर करण्यात आला होता. हा प्लाझ्मा कोरोनाची गंभीर लागण असलेल्या व्यक्तीला देण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीची प्रकृती वेगाने सुधारत असून त्याच्यावर देखरेख सुरू आहे. 

Related Stories

‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत

prashant_c

शेतकरी आंदोलनस्थळी संशयिताला अटक

Patil_p

”कोरोना युद्ध जिंकण्याच्या नावाखाली पीएम मोदींनी ऑक्सीजन, आईसीयू बेडची संख्या घटवली”

Archana Banage

शेअर बाजाराची विक्रमी उसळी; सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार

Archana Banage

आंध्र-तेलंगणात तापला जल विवाद

Patil_p

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कमल हसन सहभागी होणार

Abhijeet Khandekar