Tarun Bharat

अमृता खानविलकर देतेय योगाचे धडे

सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे योगा. योगा हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणाऱया या योगाचे महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. या महामारीच्या काळात अनेक जण योगाभ्यास करून मानसिकदृष्टय़ा स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आपले सेलिब्रिटीही अपवाद नाहीत.

  मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱया अमृता खानविलकरनेही सोशल मीडियावर योगाचे फोटोज शेअर करत, आजच्या काळात योगा किती महत्वपूर्ण आहे, हे पटवून देत आपल्या फॉलोअर्सना योगा करण्यासाठी प्रेरित केले आहे.  

आपल्या या योगाभ्यासाबद्दल अमृता खानविलकर म्हणते, सध्या आजूबाजूचे वातावरण खूपच भयंकर आहे. त्यामुळे अनेकदा नैराश्यही येते. इतकी वर्षे या क्षेत्रात असल्याने शूटिंगच्या, मीटिंग्सच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांशी भेटीगाठी होत होत्या. मित्रमैत्रिणींना भेटणं होतं असे आणि अचानक माणसांचं भेटणं बंद झाल्याने, कुठेतरी मेंटल ब्लॉक झाला आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर वावरत असतानाच पडद्यामागे आम्हीही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आयुष्य जगत असतो आणि त्यावेळी आम्हालाही कुठेतरी नैराश्य, तणाव येतोच आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगा. मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी सध्या योगाला प्राधान्य देत आहे आणि याचा मला खूपच फायदा होत आहे. त्यामुळेच मी तुम्हालाही हेच सांगेन, की दिवसातला काही वेळ तुम्हीही योगासाठी द्या. या तणावपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपाय आहे.

Related Stories

बडय़ा कलाकारांचा सोबत काम करण्यास नकार

Amit Kulkarni

‘थार’ चित्रपट 6 मेला होणार प्रदर्शित

Patil_p

ऑडिशन्समध्ये अजून होते रिजेक्ट

Patil_p

विशेष फ्लाईटने अमेरिकेत पोहचले सुपरस्टार रजनीकांत; कारण…

Tousif Mujawar

टायगर-दिशा संबंधी मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा

Archana Banage

राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

Tousif Mujawar