Tarun Bharat

अमेझॉन प्राईम व्हिडिओचे भारतातील स्पोर्ट्समध्ये पदार्पण

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

अमेझॉन प्राईम व्हिडिओने आता भारतात होणाऱया लाईव्ह स्पोर्ट्समध्ये आपले पदार्पण केल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. 2025-2026 या कालावधीत न्यूझीलंड क्रिकेटचे भारतीय परिसरात होणाऱया क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण हक्क अमेझॉन प्राईम व्हिडिओने मिळविले आहेत.

अमेझॉन आणि न्यूझीलंड क्रिकेट मंडळ यांच्यात क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपण हक्काचा काही वर्षांसाठी हा नवा करार करण्यात आला आहे. या नव्या करारामुळे न्यूझीलंडच्या पुरूष आणि महिला क्रिकेट संघांचे कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारातील आंतरराष्ट्रीय सामन्यांचे थेट प्रक्षेपण हक्क अमेझॉनला मिळाले आहे. या करारानुसार 2022 च्या प्रारंभी भारतीय क्रिकेट संघ आपला न्यूझीलंडचा दुसरा दौरा करणार आहे. तसेच 2021 च्या अखेरपासून न्यूझीलंड संघाचे विविध सामन्यांचे लाईव्ह कव्हरेज अमेझॉन करणार आहे. सदर माहिती अमेझॉन प्राईम व्हिडिओचे संचालक आणि भारतातील सर व्यवस्थापक गौरव गांधी यांनी दिली आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाशी थेट प्रक्षेपण करार झाल्याने अमेझॉनतर्फे आनंद व्यक्त करण्यात आला. या करारानुसार न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिल्या मालिकेचे प्रक्षेपण करण्याची संधी अमेझॉनला लाभली आहे.

Related Stories

‘टीपीजी’ टाटा मोर्ट्समध्ये 7,500 कोटींची गुंतवणूक करणार

Patil_p

पतंजली समूह 5 लाख लोकांना रोजगार देणार

Patil_p

इंजिन ऑईल बनविणाऱया कंपनीचे समभाग वधारले

Patil_p

ओएनजीसीचा तिमाहीत नफा वधारला

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्ट नोएडामध्ये प्रकल्प उभारणार

Patil_p

एलआयसीने ऑनलाईन पॉलिसी विक्रीसाठी डिजिझोनचा केला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!