Tarun Bharat

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून बेन्सिकची माघार

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

येथे 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया ऍमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून स्वीसची 23 वर्षीय महिला टेनिसपटू बेलिंडा बेन्सिकने कोरोनाच्या भीतीने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. आठव्या मानांकित बेन्सिकने गेल्यावर्षी या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून अनेक आंतरराष्ट्रीय महिला आणि पुरूष टेनिसपटूंनी कोरोनाच्या भीतीने यापूर्वीच माघार घेतली आहे. माघार घेणाऱया टेनिसपटूंच्या यादीत आता बेन्सिकची भर पडली आहे. मात्र पुढील महिन्यात रोम येथे होणाऱया टेनिस स्पर्धेत आपण सहभागी होणार असल्याचे बेन्सिकने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गेल्यावर्षी या स्पर्धेत कॅनडाची बिनाका अँड्रय़ेस्क्यूने विजेतेपद मिळविताना उपांत्य सामन्यात बेन्सिकचा पराभव केला होता. अँड्रय़ेस्क्यूने 2020 अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड बार्टी, युक्रेनची स्विटोलिना, सातवी मानांकित बर्टन्स या महिला टेनिसपटू अमेरिकन टेनिस स्पर्धेत यावेळी खेळणार नाहीत. पुरूष विभागात स्पेनचा राफेल नदाल यानेही या स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येते.

Related Stories

पीव्ही सिंधू, लोवलिनाचे पदक निश्चित!

Patil_p

भारत-चायनीज तैपेई महिला फुटबॉल संघात आज लढत

Patil_p

इटालियन कर्णधार शेलिनी निवृत्त होणार

Patil_p

अझारेन्का, सॅम क्वेरीला पराभवाचा धक्का

Omkar B

मानांकनात मिताली राजचे अग्रस्थान कायम

Patil_p

आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेतील सामने रद्द होणार नाहीत

Patil_p