Tarun Bharat

अमेरिकन नौदलाचा भारतीय हद्दीत विनापरवाना सराव

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेच्या नौदलाने भारताच्या परवानगीशिवाय लक्षद्वीप समूहाच्या पश्चिमेला जवळपास 130 सागरी मैल प्रवास करून युद्धसराव केला. अमेरिकेच्या सातव्या आरमाराचे हे कृत्य भारताच्या समुद्र नौवहन संरक्षण धोरणाचे उल्लंघन आहे. 

अमेरिकन नौदलाने म्हटले आहे की, एप्रिल रोजी अमेरिकन नौदलाची युद्धनौका युएसएस जॉन पॉल जोन्सने (डीडीजी 53) भारताची परवानगी न घेता लक्षद्वीपपासून 130 समुद्र मैल अंतरावर असलेल्या भारतीय हद्दीत नौवहन अधिकार आणि स्वतंत्रतेसाठी सराव केला. भारताच्या या विशेष क्षेत्रातून जाण्यासाठी अथवा युद्ध सराव करण्यासाठी पूर्व सुचना देणे आवश्यक आहे. मात्र, अमेरिकेने तसे न करता ही ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्यांना धरून असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

फिलिपाईन्समध्ये किलो कांद्याची किंमत 900 रुपये

Patil_p

भारतासह 30 देशांना कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका

Patil_p

15 कोटी रॅपिड टेस्ट करणार

Patil_p

ऑस्ट्रलियात वाढले ओमिक्रॉनचे रुग्ण, निर्बंधाचे अनुकरण

Patil_p

चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पासाठी भारतासोबत कोणताही करार नाही, इराणचे स्पष्टीकरण

datta jadhav

इस्रायलच्या प्रतिहल्ल्यामुळे पॅलेस्टाईमध्ये पळापळ

Patil_p