Tarun Bharat

अमेरिकन नौदलाच्या आण्विक पाणबुडीला अपघात; 11 जवान जखमी

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन नौदलाची आण्विक पाणबुडी अज्ञात वस्तूला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात नौदलाचे 11 जवान जखमी झाले आहेत.

अमेरिकन नौदलाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, युएसएस कनेक्टिकट ही नौदलाची आण्विक पाणबुडी आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेत होती. त्यावेळी एका अज्ञात वस्तूला धडकल्याने पाणबुडीला अपघात झाला. यात अमेरिकन नौदलाचे 11 जवान जखमी झाले आहे. पाणबुडी अपघातानंतर स्थिर असून, कोणत्याही आण्विक संयंत्राचे नुकसान झाले नाही. मात्र, या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात तैवान आणि अन्य देशांवर चीनकडून दादागिरी सुरू आहे. त्यामुळे अमेरिकन नौदलाने तैवानच्या मदतीला या भागात आपले एअरक्राफ्ट कॅरिअर आणि आण्विक पाणबुडी तैनात ठेवली आहे.

Related Stories

लसीकरणामुळे मालामाल

Patil_p

‘ऑफिस आवर’नंतर मेसेज पाठविणे अवैध

Patil_p

चीन-अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला

Patil_p

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

पक्षातून पंतप्रधान ओली यांची हकालपट्टी

Patil_p

परिस्थितीचे योग्य भान राखा!

Patil_p