Tarun Bharat

अमेरिकन पुस्तकात कोकणातील तीन लोककथा

प्रतिनिधी / कणकवली:

सातासमुद्रापार फक्त भाषाच पोहोचते, असे नाही, तर त्या भाषा-संस्कृतीतील लोकसंस्कृतीही पोहोचते. कोकणातील तीन लोककथांचा समावेश अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकात केला गेला आहे. ‘वॉटर स्टोरिज ऑफ नेटिव्ह अमेरिकन ऍण्ड एशियन इंडियन इट्स लिजेंड ऑफ रेन रिव्हर्स ऍण्ड लेक्स’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. कोकणातील प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी संशोधन केलेल्या दोन लोककथांचा तसेच कवी मोहन पाटील यांनी लबडे यांना सहकार्य केलेल्या एका कथेचा अशा एकूण तीन कथांचा या ग्रंथात समावेश आहे.

अमेरिकन लेखिका व लोकसाहित्याच्या संशोधिका संकलक तेरेसा पिजॉन व संशोधक डॉ. अरुण चिंतामण प्रभुणे या दोघांच्या स्वतंत्र लिहिलेल्या प्रस्तावना हे या पुस्तकाचे विशेष वैशिष्टय़ आहे. भारत व अमेरिका या दोन देशातील भिन्न संस्कृती केवळ जलतत्वाशी संबंधित लोककथा, दंतकथांच्या संशोधित बीजना पूर्ण रुपात साकारणारे अमेरिकेत प्रकाशित होणारे हे पहिलेच पुस्तक आहे. अमेरिकेतील मूळ रहिवाशांच्या कथांची डॉ. प्रभुणे यांनी पुनर्निर्मिती केली आहे. भारतात पवित्र समजली जाणारी मकराधिष्टीत नर्मदा नदी आणि खडकात कोरून काढलेल्या नावेतून प्रवास करणारा नेटिव्ह आणि अमेरिकन देवता रुप मानला गेलेला डेगीनाविडा असे अर्थपूर्ण मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे.

पुस्तकात कोकणातील या तीन लोककथांबरोबर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या चार राज्यातील दहा लोककथांचाही समावेश आहे. भारत आणि अमेरिका यात मोठे अंतर असूनही समजुती, कल्पना यात कमालीचे साम्य या कथांमध्ये आहे.

Related Stories

रत्नागिरी : धामणी येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या घुसला पेट्रोल पंपात

Archana Banage

संपादकाचार्य बाबुराव पराडकर यांचं सिंधुदुर्गात स्मारक व्हावं – बबन साळगावकर

Anuja Kudatarkar

पाणी योजनेचा कोटय़वधीचा खर्च ‘पाण्यात’!

Patil_p

विहिंपतर्फे ओवळीये व फणसवडे गावात धान्यादी साहित्याचे वितरण

Anuja Kudatarkar

लॉकडाऊनमधील नियमांची पायमल्ली करुन पर्ससीन मासेमारी

Patil_p

मेर्वीत पुन्हा एकदा बिबटय़ाचा वासरावर हल्ला

Patil_p