Tarun Bharat

अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात करणार 15 कोटी डॉलरची गुंतवणूक

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात मध्यम आणि उच्च कौशल्य प्रशिक्षणासाठी 15 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

अमेरिकेत काम करणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांचे कौशल्य अद्ययावत करणे. तसेच नव्या पिढिला हे कौशल्य अवगत व्हावे, यासाठी अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी गुंतवणूक करणार आहे. एच-1 बी व्हिसाच्या मदतीने लाखो विदेशी कर्मचारी अमेरिकेत काम करतात. 

अमेरिकेत उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, मीडिया यासारख्या विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अमेरिकेतील वास्तव्याचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय प्रस्तावाधीन आहे. 

Related Stories

श्रीलंकेचे अध्यक्ष पलायनाच्या तयारीत ?

Patil_p

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Archana Banage

आलिशान जीवन सोडून बेटावर वास्तव्य

Patil_p

युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या 63 सैनिकांचा मृत्यू

Patil_p

फ्रान्समध्ये सार्वजनिक स्थळी मास्क अनिवार्य

Patil_p

व्ही-चॅटवर बंदी घातल्यास चीन अ‍ॅपल कंपनीवर बहिष्कार टाकेल

datta jadhav