Tarun Bharat

अमेरिका-रशियामध्ये करार

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

शस्त्रास्त्र नियंत्रण करार पुढील एक वर्षापर्यंत वाढविण्याची तयारी अमेरिका आणि रशियाने दर्शविली आहे. दोन्ही देशांनी यासंबंधीचा प्रस्ताव स्वीकारण्यास स्वतःची मंजुरी दिली आहे. अण्वस्त्रांची संख्या वर्तमान मर्यादेवरच कायम ठेवण्यास तयार असल्याचे म्हणत रशियाने दोन्ही देशांमधील शस्त्रास्त्र नियंत्रण कराराला मुदतवाढ देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

न्यू स्टार्ट करारावर 2010 मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे राष्ट्रपती दिमित्री मेदमेदेव यांनी स्वाक्षरी केली होती. हा करार प्रत्येक देशाला 1,550 हून अधिक अण्वस्त्रs आणि 700 प्रक्षेपास्त्र तसेच बॉम्बवर्षक शस्त्रांपेक्षा अधिक तैनात करण्याची अनुमती देत नाही. या कराराचे पालन होतेय की नाही हे पाहण्यासाठी प्रत्यक्षस्थळी जाऊन निरीक्षण करण्याचीही तरतूद आहे. दोन्ही देशांदरम्यान सध्या ‘न्यू स्टार्ट’ हा एकमात्र अण्वस्त्र नियंत्रण करार आहे.

अमेरिकेकडून स्वागत

रशियाच्या प्रस्तावाचे अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्या मॉर्गन ओर्टागस यांनी स्वागत केले आहे. अमेरिका जलदपणे करार लागू करण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले. रशिया आणि अमेरिका दोघांनीही फेब्रुवारीत समाप्त झालेल्या न्यू स्टार्ट कराराच्या संदर्भात परस्परांचे प्रस्ताव फेटाळून लावले होते.

दोन्ही देशांकडे मोठा साठा… अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रांचा मोठा साठा आहे. परंतु, अमेरिकेच्या तुलनेत रशियाकडील शस्त्रास्त्रांचा मारक पल्ला अधिक आहे. रशिया सातत्याने अण्वस्त्रसक्षम शस्त्रास्त्रांच्या नव्या प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो.

Related Stories

कोरोना संसर्गावर नव्या उपचारपद्धतीची तयारी

Patil_p

ऑक्सफर्डची लस ठरणार 90 टक्के प्रभावी

Omkar B

लॉकडाऊनवरून ब्रिटनमध्ये तीव्र मतभेद

Patil_p

कोरोनाबाधित नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

तुमच्या अंगणातील साप शेवटी तुम्हालाच दंश करणार- एस. जयशंकर

Abhijeet Khandekar

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

datta jadhav