Tarun Bharat

अमेरिकेचा टेल फ्रिझ उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ टय़ुरीन (इटली)

2022 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर फ्रिझने एकेरीची अंतिम फेरी गाठताना कॅनडाच्या ऍलिसीमेचा पराभव केला. स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालने नॉर्वेच्या कास्पर रुडवर विजय मिळविला पण या स्पर्धेतील नदालचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

पुरुष एकेरीच्या गुरुवारी झालेल्या सामन्यात टेलर फ्रिझने फेलिक्स ऍलिसीमेचा 7-6(7-4), 6-7(5-7), 6-2 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. टेनिस क्षेत्रात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱया या स्पर्धेत फ्रिझने पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवित उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या सामन्यात फ्रिझने 32 विजयी फटक्यांची नोंद केली. सदर सामना जवळपास तीन तास चालला होता. चालू वर्षाच्या प्रारंभी झलेल्या इंडियन वेल्समधील एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत 25 वर्षीय फ्रिझने जेतेपद मिळविले होते. तसेच त्याने इस्टबोर्न आणि टोकियोतील स्पर्धा जिंकल्या होत्या.

स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालने या स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात नदालने नॉर्वेच्या कास्पर रुडचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत नदाल ग्रीन गटाचे प्रतिनिधीत्व करीत होता. या सामन्यात नदालने 37 तर रुडने 19 विजयी फटके मारले. हा सामना दीड तास चालला होता. नॉर्वेच्या कास्पर रुडने या पराभवानंतरही सदर स्पर्धेत सलग दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे.

Related Stories

साबालेन्काकडून पेगुला पराभूत

Patil_p

रियल काश्मीर सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत

Patil_p

नेपाळ, कॅनडा संघांची विजयी सलामी

Patil_p

पाकचा इंग्लंड दौरा थांबणार नाही : जाईल्स

Patil_p

गोव्याला हरवून गुजरातचा दुसरा विजय

Patil_p

इंग्लंडच्या रूटचे 19 वे कसोटी शतक

Patil_p