Tarun Bharat

अमेरिकेचे सौदी अरेबियाविरोधात कठोर पाऊल

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखन करणारे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचा हात असल्याचा धक्कादायक खुलासा गुप्तचर यंत्रणांनी केला. त्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाविरोधात कठोर पाऊले उचलत काही निर्बंध लादले. नागरिकांच्या व्हिसावरही बंदी घातली.

पत्रकार जमाल खाशोगी मूळचे सौदीचे होते. मात्र, त्यांना अमेरिकेचे कायदेशीर नागरिकत्व होते. 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दुतावासात हत्या करण्यात आली. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. त्यानुसार सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच पत्रकार खाशोगी यांना ठार मारण्यासाठी इस्तंबूल आणि टर्कीमध्ये ऑपरेशन राबविण्यास मंजुरी दिली होती. हा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेने सौदीवर निर्बंध लादले.

Related Stories

चीनच्या सायबर आर्मीत लाखो हॅकर

Patil_p

पाकिस्तान कंगाल झाल्याची इम्रान यांची कबुली

Patil_p

संयुक्त राष्ट्राने तालिबानला सुनावलं

Archana Banage

1 लाख रुपयांची नोट आणणार व्हेनेझुएला

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर 15 ऑगस्टला फडकणार तिरंगा

datta jadhav

हनीफ टायगरच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनचा नकार

datta jadhav