Tarun Bharat

अमेरिकेच्या चौकशी पथकास चीनने प्रवेश नाकारला

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी अमेरिकेच्या तज्ञांचे पथक वुहानला पाठविण्यात येणार होते. मात्र, चीनने अमेरिकेचा या संदर्भातील प्रस्ताव फेटाळला आहे.
   

कोरोनाच्या प्रसाराला चीनच जबाबदार असल्याचा ठपका संपूर्ण जगाने चीनवर ठेवला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याने अमेरिकेने या वृत्ताची पडताळणी करण्याचे ठरवले असून, त्यासाठी एक पथक चीनला पाठवण्यात येणार होते. मात्र, चीनने अमेरिकेच्या या पथकाला वुहानमध्ये येण्यास मज्जाव केला आहे.
 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग याविषयी म्हणाले,  कोरोना हा सगळ्या मानवतेचा शत्रू आहे. तो जगात केव्हाही कुठेही येऊ शकतो. तसाच तो चीनमध्ये आला. कोरोनाच्या प्रसाराशी चीनचा संबंध नाही. याउलट चीनने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, कोरोनाच्या फैलावाला चीनला जबाबदार धरत जर्मनीने देशात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीचे 130 अब्ज युरोचे बिल चीनला पाठविले आहे. जर्मनीच्या या हालचालीने चीनला मोठा धक्का बसला आहे.

Related Stories

भाजपने दलित नेत्याला मुख्यमंत्री करावे: सिद्धरामय्या

Archana Banage

रशिया थकबाकीदार ठरण्याची भीती

Patil_p

दोन परदेशी नागरिकांच्या पोटातून हेरॉइनच्या 165 कॅप्सूल केल्या जप्त

Abhijeet Khandekar

मेक्सिकोमध्ये 12,153 नवे कोरोनाबाधित; 1,707 मृत्यू

Tousif Mujawar

..मग घरातून बाहेर पडलो तर विचार करा : उद्धव ठाकरे

Archana Banage

कवलापूर येथे लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Abhijeet Khandekar