Tarun Bharat

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 11 लाखांच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कोरोनाबाधितांची संख्या आता 11 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 30 हजार 829 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 95 हजार 023 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 63 हजार 856 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 52 हजार 324 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 8 लाख 78 हजार 843 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 226 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 3 लाख 10 हजार 839 रुग्ण आढळले आहेत.  तर 23 हजार 780 लोकांचा मृत्यू झाला आहे.  यानंतर न्यू जर्सीमध्ये 1 लाख 18 हजार 652 कोरोना रुग्णांपैकी 7 हजार 228 लोक मरण पावले.  या व्यतिरिक्त, मॅसाचुसेट्स, इलिनॉय येथेही कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.

Related Stories

पेगासस प्रकरण : गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा; राहुल गांधी यांची मागणी

Rohan_P

आफ्रिकन महिलेला मुंबई विमानतळावर ५६ कोटींच्या हेरॉईनसह अटक

Sumit Tambekar

तब्बल 16 महिन्यांनी उघडले अंबाबाई मंदिराचे महाद्वार

Abhijeet Shinde

तालिबान्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; रोहुल्लाह सालेह यांची फरफट करत घातल्या गोळ्या

Abhijeet Shinde

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Rohan_P

अतिप्राचीन स्मारकाचे रहस्य गुलदस्त्यातच!

Patil_p
error: Content is protected !!