Tarun Bharat

अमेरिकेतून भारतात येणार 100 व्हेंटिलेटर

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

अमेरिकेतून 100 व्हेंटिलेटर पुढील आठवड्यात  जहाजामार्गे भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली. 

कोरोनाच्या सध्यस्थीतीवर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली. त्यावेळी ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात जहाजाने 100 व्हेंटिलेटर भारतात पाठवले जातील, असे सांगितले. चर्चेदरम्यान, भारत-चीन सीमेवरची तणावग्रस्त परिस्थिती तसेच जागतिक आरोग्य संघटनेतल्या सुधारणांविषयी चर्चा झाली. 

भारत-चीन सीमेवर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी यावेळी दिला. मात्र, दोन्ही देशांनी ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. कोरोनानंतरच्या जगात भारत आणि अमेरिकेतील संबंध महत्वाचा स्तंभ ठरेल, असे मोदींनी म्हटले आहे.

Related Stories

गुणवत्तेची उपेक्षा होऊ नये

Patil_p

कॅप्टन अमरिंदर सिंगांवर सिद्धूंचा शाब्दिक हल्ला

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱयाविषयी कुतूहल

Patil_p

जलसमाधी आंदोलन : राजू शेट्टी नृसिंहवाडीकडे मार्गस्थ

Abhijeet Shinde

मेकेदातू प्रकल्पाबाबत तडजोड नाही: मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde

हॉंगकॉंगकडून एअर इंडियाच्या विमानांवर पुन्हा बंदी

datta jadhav
error: Content is protected !!