Tarun Bharat

अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरून वाद

चित्रफितीत दिसला पोलिसांचा छळ – कृष्णवर्णीयाला दिला वीजेचा झटका

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

अमेरिकेच्या लुइसियानामध्ये एका कृष्णवर्णीयाचा पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाल्याप्रकरणी वाद उभा ठाकला आहे. 2019 च्या या प्रकरणी पोलिसांनी पूर्वी रोनाल्ड ग्रीनचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या कारचा पाठला करत होतो आणि कार झाडाला आदळल्याचा दावा केला होता. पण आता एक चित्रफित समोर आली असून यात पोलीस रोनाल्डला वीजेचा झटका देताना आणि बुक्क्यांनी मारताना दिसून येत आहेत. या प्रकारादरम्यान मला माफ करा, मी घाबरलोय असे ओरडताना रोनाल्ड दिसून येत आहे.

हे प्रकरण 10 मे 2019 रोजीचे आहे. पोलिसांनी 49 वर्षीय रोनाल्ड ग्रीनची कार रोखण्याचा प्रयत्न केला होता. रोनाल्डने वाहतुकीच्या नियमांचा भंग केला होता असे पोलिसांनी म्हटले होते. कार एका झाडाला आदळल्याने ग्रीनचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांनी स्वतःच्या लेखी अहवालात मात्र ग्रीनने अटकेच्या कारवाईवेळी संघर्ष केल्याने जखमी झाला होता, रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते.

या घटनेची एक चित्रफित प्राप्त झाली आहे. सर्व श्वेतवर्णीय अधिकाऱयांनी ग्रीनचा कारचा दरवाजा उघडून त्याला स्टेनगनने करंट दिल्याच्s दिसून येते. अधिकाऱयांनी त्याला जमिनीवर पाडून त्याची मान दाबली होती. त्यानंतर त्याच्या चेहऱयावर बुक्क्यांनी मारहाण केली, एका पोलीस अधिकाऱयाने त्याला खेचले आणि बेडय़ा ठोकण्यापूर्वी आणखीन एकदा करंट देण्यात आल्याचे चित्रफितीत आढळून येते. प्रांतायच अधिकाऱयांनीही एक चित्रफित प्रसारित केली आहे.

ग्रीनच्या कुटुंबाने याप्रकरणी 2020 मध्ये खटला दाखल केला होता. संबंधित पोलीस अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले होते, पण पुढील काळात ते कामावर परतले होते. यातील एका पोलीस अधिकाऱयाचा कार दुर्घटनेत मृत्यू झाला होता. ग्रीन प्रकरणी निलंबित करण्यात आल्याच्या काही तासांनीच ही दुर्घटना घडली होती.

Related Stories

चुकून केले भावाशीच लग्न

Patil_p

एअरस्ट्राईकची भीती, पाकचा युद्धाभ्यास

Patil_p

लाइट पॉल्युशनमुळे मधुमेहाची भीती

Patil_p

इस्त्रायलकडून चौथा डोस देण्यास सुरूवात

Patil_p

ब्राझीलचे शिक्षणमंत्री डिकोटेली यांचा राजीनामा

datta jadhav

महिलांना पुरुषविरहित वर्गात शिकण्यास अनुमती

Patil_p
error: Content is protected !!