Tarun Bharat

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

आतापर्यंत 20 हजारांहून अधिक जणांचा बळी

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

   अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, मृतांच्या आकडेवारीचा आलेखही चढाच आहे. अमेरिकेत आतापर्यंत 5 लाख 33 हजार 115 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 20 हजार 580 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. इटलीला मागे टाकत अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 20 हजारांपार गेली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग होत आहे. न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 80 हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 8600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यूजर्सीमध्ये करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूजर्सीमध्ये 58 हजारजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 2100 जणांचा मृत्यू झाला आहे.  

इटलीमध्ये 1 लाख 52 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 19 हजार 468 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोना संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

Related Stories

”भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र”

Abhijeet Khandekar

चीनला उत्तर देण्यासाठी IAF ची लढाऊ विमाने सज्ज

datta jadhav

‘या’ देशात 2 वर्षांवरील मुलांनाही दिली जातेय कोरोना लस

datta jadhav

राज्यात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर तर पॉझिटिव्हीटी रेट १२ टक्क्यांवर ; राजेश टोपेंची माहिती

Archana Banage

अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

Archana Banage

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Archana Banage