Tarun Bharat

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी 25 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 25 लाख 04 हजार 588 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 26 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत मागील 24 तासात 40 हजार 185 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 649 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 25.04 लाख कोरोना रूग्णांपैकी 10 लाख 52 हजार 293 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 13 लाख 25 हजार 515 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 723 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 4 लाख 14 हजार 274 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 31 हजार 373 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॅलिफोर्नियात 2 लाख 01 हजार 004 जणांना बाधा झाली असून, 5 हजार 809 रुग्ण दगावले आहेत. 

Related Stories

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ; सुर्यकुमार, क्रुणाल व कृष्णाला संधी

Archana Banage

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

Tousif Mujawar

आयपीएलनंतर ‘या’ खेळाडूंना विश्रांती

Archana Banage

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav

नव्व्यान्नव वर्षाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने जमवले 20 कोटी

prashant_c

विवाहबंधनात अडकली मलाला यूसुफजई

Patil_p