Tarun Bharat

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 85 लाखांचा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 85 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 85 लाख 20 हजार 307 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 26 हजार 149 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत मंगळवारी 61 हजार 429 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 917 जणांचा मृत्यू झाला आहे. 85.20 लाख कोरोना रूग्णांपैकी 55 लाख 45 लाख 619 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 27 लाख 48 हजार 539 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 714 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 कोटी 78 लाख 34 हजार 876 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 84 हजार 615 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 17 हजार 028 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 8 लाख 82 हजार 893 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 680 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 22 हजार 513 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 507 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

टोकियोत भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीची शक्यता

datta jadhav

सीमावादाबाबत नेपाळची नरमाईची भूमिका

datta jadhav

”रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज”

Sumit Tambekar

इटली, स्पेन, फ्रान्समध्ये गंभीर संकट

tarunbharat

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

बाइकवरून 11 देशांची सैर

Patil_p
error: Content is protected !!