Tarun Bharat

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांपार

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांपार गेली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 30 लाख 41 हजार 129 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 32 हजार 993 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत सोमवारी 50 हजार 586 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 378 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 30.41 लाख कोरोना रूग्णांपैकी 13 लाख 25 हजार 516 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 15 लाख 82 हजार 620 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 198 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 4 लाख 22 हजार 851 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 हजार 267 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॅलिफोर्नियात 2 लाख 77 हजार 433 जणांना बाधा झाली असून, 6 हजार 445 रुग्ण दगावले आहेत. 

Related Stories

पुतिन-एर्दोगान भेटीवर झेलेन्सकी यांचा नवा खुलासा

Archana Banage

चीनवर ‘आंतरराष्ट्रीय’ दबावतंत्र

Patil_p

एसटी विलीनीकरण : राज्य सरकारने मागितली 15 दिवसांची मुदतवाढ

datta jadhav

पुलवामामध्ये एका पाकिस्तानी नागरिकासह जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर ड्रोन? छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Archana Banage

भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्या कारला भीषण अपघात

datta jadhav
error: Content is protected !!