Tarun Bharat

अमेरिकेत कोरोना लसीची पहिली चाचणी यशस्वी

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 


अमेरिकेत कोरोना लसीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. ही लस टोचण्यात आलेल्या आठ जणांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती वाढली असून, समाधानकारक रिझल्ट समोर आल्याचे कोविड-19 वर लस तयार  करणाऱ्या मोडर्ना थेराप्युटीक्स कंपनीने जाहीर केले आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी अमेरिकेतील मोडर्ना थेराप्युटीक्स कंपनीने ही लस विकसित केली होती. मार्च महिन्यापासून या लसीच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. पहिल्या आठ जणांना या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. या आठ जणांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजची प्रयोगशाळेत चाचणी केली असता ही लस सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच आठ जणांच्या शरीरात कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे. त्यामुळे आता ही कंपनी दुसऱ्या 600 स्वयंसेवकांवर mRNA-1273 लसीची चाचणी करणार आहे. तर या लसीचा तिसरा टप्पा जुलै महिन्यात असेल, तेव्हा 1 हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येईल.

अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाकडून या कंपनीला आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. जगात इतर 100 ठिकाणी कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे.

Related Stories

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवारच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार -संजय राऊत

Archana Banage

छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्या यांनी केलं ‘हे’ विधान

Archana Banage

33 देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव

Patil_p

‘त्या’ ड्रग्स पार्टीत भाजपच्या कोणत्या नेत्याच्या मेव्हणा?, नवाब मलिक उद्या पोलखोल करणार

Archana Banage

पुतीन यांच्याकडून ‘हिरोशिमा, नागासाकी’चा उल्लेख

Patil_p

कुलभूषण जाधव यांचा फेरविचार याचिकेस नकार; पाकचा दावा

datta jadhav
error: Content is protected !!