Tarun Bharat

अमेरिकेत गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

Advertisements

इलिनॉयच्या क्रीडा संकुलातील घटना : 3 जखमी, संशयित ताब्यात

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

अमेरिकेतील इलिनॉयच्या क्रीडा संकुलात शनिवारी एका व्यक्तीने बेछूट गोळीबार केला आहे. या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती रॉकफोर्ड पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

पोलिसांनी डॉन कार्टर लेन्स बॉलिंग एलीनजीकच्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. अमेरिकेत 2019 मध्ये अन्य वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत. 4 किंवा अधिक लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गोळीबाराला मास शूटिंग संबोधिण्यात येते. 2019 मध्ये 41 मास शूटिंगच्या घटना घडल्या असून यात एकूण 211 जणांचा मृत्यू झाला आहे.

बंदुकांचे प्रचंड प्रमाण अमेरिकेत सुमारे 31 कोटी शस्त्रास्त्रs आहेत, 66 टक्के लोकांकडे एकापेक्षा अधिक बंदुका आहेत. जगातील एकूण नागरी बंदुकांपैकी 48 टक्के केवळ अमेरिकेतील नागरिकांच्या ताब्यात आहेत. 89 टक्के अमेरिकन नागरिक स्वतःजवळ बंदूक बाळगतात. यातील 66 टक्के लोक एकापेक्षा अधिक बंदुका बाळगतात. अमेरिकेत बंदूक निर्मितीक्षेत्राचे वार्षिक उत्पन्न 91 हजार  कोटी रुपयांचे असून 2.65 लाख या क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत शस्त्रास्त्रांच्या विक्रीद्वारे 90 हजार कोटी रुपयांची भर पडते.

Related Stories

कोरोनाच्या उत्पत्तिवर चीनचे स्पष्टीकरण

Patil_p

महिलेने स्वतःसोबतच केला विवाह

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav

ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लांबणीवर

Omkar B

देव तारी त्याला…

Amit Kulkarni

त्याला जागे करण्याची हिंमत कोणातही नाही

Patil_p
error: Content is protected !!