अमेरिकेतील स्थिती अत्यंत बिघडत चालली असून दिवसभरात तेथे 2 हजार 15 जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू ओढवला आहे. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्येष्ठ पुत्रही कोरोनाबाधित झाला आहे. अमेरिकेत बाधितांचा आकडा अत्यंत वेगाने वाढत आहे. संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येतही वाढ दिसून आली आहे. स्वातंत्र्याच्या नावावर कठोर उपाय टाळण्यात आल्यास रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक राहणार नसल्याची भीती काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. दिवसभरात अमेरिकेत बाधितांचा आकडा 1 लाख 87 हजाराने वाढला आहे. तेथील एकूण बाधितांचा आकडा आता 1 कोटी 22 लाखांहून अधिक झाला आहे. तर 2 लाख 60 हजार बाधित दगावले आहेत. अमेरिकेत पहिला रुग्ण जानेवारीत सापडला होता. तर मागील दोन आठवडय़ांपासून तेथे प्रतिदिन सरासरी 1.5 लाखाने रुग्ण वाढत आहेत.


previous post