Tarun Bharat

अमेरिकेत फुलले अजब पुष्प

Advertisements

मृतदेहाप्रमाणे येते दुर्गंधी, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया भागात एक विशाल आणि दुर्गंधीयुक्त फुल बहरले आहे. हे फुल पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येत लोक येत आहेत. इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये आढळणाऱया या फुलाला ‘मृत रोप’ म्हटले जाते. हे फुल दक्षिण कॅलिफोर्नियाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये फुलले आहे. अमोरफोफलस प्रजातीच्या या रोपात रविवारी दुपारी फुल फुलू लागले होते.

मंगळवार संध्याकाळपर्यंत या गार्डनची सर्व तिकीटे या फुलामुळे विकली गेली. हे फुल सुमारे 48 तासांपर्यंत फुललेले राहिले आणि त्यानंतर कोमजले. हे फुल मृतदेहाप्रमाणे दुर्गंधी निर्माण करणारे होते. तसेच ते चाकूने कापता येणारे होते असे सॅन दियागोचे हॉर्टिकल्चर मॅनेजर जॉन कार्नर यांनी सांगितले आहे.

अशाप्रकारे एका अन्य घटनेत सुमात्रा टायटन फुल काही काळासाठी फुलल्याने ते पाहण्यासाठी गर्दी झाली. हे फुल आता विलुप्त होण्याच्या मार्गावर असून अनेक लोकांनी ते ऑनलाईन पाहिले आहे. या दुर्लभ फुलाला अमोरफोफलस टिटॅनम म्हटले जाते आणि 10 फूट उंच असू शकते.

या फुलांची रोपे केवळ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर निर्माण होतात. सुमात्रामध्ये सातत्याने जंगल नष्ट होत असल्याने ही रोपे आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना वाचण्यासाठी जगभरातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Related Stories

सौरमंडलाच्या बाहेर पृथ्वींची रेलचेल

Patil_p

भटक्या श्वानांचा ‘रॉबिनहुड’

Amit Kulkarni

अच्युत पालव यांच्या अक्षरचित्रांचं प्रदर्शन 21 जानेवारी पासून

prashant_c

वांग्याच्या झाडावर लटकले टोमॅटो

Patil_p

परीसारखे सुंदर केस असणारी महिला

Patil_p

हार्मोन असंतुलनावर शीर्षासन हा उपाय

Amit Kulkarni
error: Content is protected !!