Tarun Bharat

अमेरिकेत बाधितांची संख्या 1.5 कोटींच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 1.5 कोटींच्या उंबरठ्यावर आहे. या देशात आतापर्यंत 1 कोटी 49 लाख 83 हजार 425 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 87 हजार 825 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत शनिवारी 2 लाख 08 हजार 790 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 2251 जणांचा मृत्यू झाला. 01.49 कोटी कोरोना रूग्णांपैकी 87 लाख 87 लाख 738 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 49 लाख 07 हजार 862 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 26 हजार 261 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 20 कोटी 58 लाख 41 हजार 812 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 13 लाख 42 हजार 779 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 23 हजार 182 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 13 लाख 40 हजार 716 जणांना बाधा झाली असून, 19 हजार 879 रुग्ण दगावले आहेत. 

Related Stories

5 पट अधिक डोस दिल्याने तब्येत बिघडली

Patil_p

कोरोनाशी लढणारी सर्वात प्रभावी अँटीबॉडी तयार

Patil_p

अमेरिकेचा हवाई हल्ला : 90 दहशतवादी ठार

Patil_p

ट्रम्प यांच्यावर बायडन संतापले

Patil_p

रशियाकडून क्लस्टर बॉम्बचा वापर

Patil_p

डोनबासची लढाई सुरू; तत्काळ शस्त्रे खाली करा; रशियाचा इशारा

Archana Banage
error: Content is protected !!