Tarun Bharat

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात कोरोनाचे 2494 बळी

Advertisements

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : 

अमेरिकेत मागील 24 तासात 2494 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील एकूण कोरोनाबळींची संख्या आता 54 हजारांपार पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही आता कोरोनापुढे हतबल झाला आहे. 
 

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख 60 हजार 896 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 54 हजार 265 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 18 हजार 162 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 7 लाख 88 हजार 479 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 110 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

 दरम्यान, अमेरिकेतील स्मिथफील्ड या मीट (मांस) फॅक्टरीतील 3700 कर्मचाऱ्यांपैकी 725 कर्मचारी कोरोनाबधित आढळले आहेत. या फॅक्टरीतून अमेरिकेत मीटचा सर्वाधिक पुरवठा केला जातो. त्यामुळे साऊथ डकोटा राज्यात जवळपास 55% लोकांना कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

रशियाच्या कोळशावर पाश्चात्यांची बंदी

Patil_p

हाँगकाँगमध्ये कोरोनाचा उद्रेक, प्रशासनाची तारांबळ

Omkar B

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीनं बजावले पुन्हा समन्स!

Archana Banage

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात केरळच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

4 वर्षांत 168 आमदार-खासदारांचे पक्षांतर

Patil_p

राज्यात रुग्णालयांच्या ठिकाणीच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर

Archana Banage
error: Content is protected !!