Tarun Bharat

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, रात्री 9 वाजता संपेल. तर भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजेपासून मतदान सुरू होईल.

राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन रिंगणात आहेत. अमेरिकेच्या 50 राज्यातील 24 कोटी मतदार आज मताधिकार वापरतील. 

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया, फ्लोरिडा आणि ॲरिझोना या चार प्रमुख राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा अधिक मते मिळण्याचा अंदाज ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाला आहे. 

तर ट्रम्प यांना कोणत्याही राज्यात 44 पॉइंट्‌सहून अधिक पाठबळ नाही. त्यामुळे त्यांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. 

Related Stories

रशियाला शस्त्रास्त्र पुरवतोय उत्तर कोरिया

Amit Kulkarni

राज्यात २०२४ ला पुन्हा भाजप-रिपाईची सत्ता आणू : ना. रामदास आठवले

Archana Banage

बिहार : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

कॅनडात भारतीय वंशाची महिला संरक्षणमंत्री

Patil_p

डब्ल्यूएचओचा इशारा

Patil_p

घरात सापडली 500 वर्षे जुनी विहिर

Patil_p
error: Content is protected !!