Tarun Bharat

अमेरिकेत हाहाकार : सलग दुसऱ्या दिवशी 2 हजार लोकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत तर या व्हायरस ने हाहाकार मजवला आहे. सध्या तिथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे जवळपास 2000 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा 14 हजारच्या वर पोहचला आहे. तर चार लाख पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मंगळवारी कोरोनामुळे 1939 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर बुधवारी हा आकडा 1973 वर पोहोचला आहे. तर अमेरिकेतील मुख्य केंद्र असलेल्या न्यूयॉर्क मध्ये बुधवारी 779 लोकांचा मृत्यू झाला. 

तर आत्तापर्यंत अमेरिकेत मृत्यू पावलेल्या नागरिकांमध्ये 11 भारतीयांचा समावेश आहे. तर अजून 16 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, ते सर्व पुरुष आहेत. यातील 10 जण न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी मधील आहेत. आणि मृत्यू  झालेल्यांपैकी चार जण न्यूयॉर्क मधील असून ते तेथे टॅक्सी चालवण्याचे काम करत होते. अशी माहिती समोर आली आहे. 

Related Stories

पाय नसतानाही बास्केटबॉलच्या टीममध्ये सामील

Patil_p

19 वर्षीय युवती जगाच्या भ्रमंतीवर

Amit Kulkarni

“गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही तर भाजप काय विकत आहे?”

Archana Banage

कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना; सुप्रिया सुळेंची घोषणा

Archana Banage

‘सन्नाटा’ झाला शांत ; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

Archana Banage

TMC ला धक्का; ऐन निवडणुकीत 5 आमदार भाजपात

datta jadhav