Tarun Bharat

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत पोलिसांच्या ताब्यातील जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरु असलेला हिंसाचार अद्याप थांबला नाही. फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनप्रकरणी अमेरिकेच्या 17 शहरांमधून आतापर्यंत 1400 जणांना अटक करण्यात आली आहे. 

आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लॉयड या व्यक्तीचा सोमवारी मिनियापोलीस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. फ्लायड याच्या मृत्यूच्या व्हिडिओनंतर शुक्रवारपासून अमेरिकेत आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी सेंट पॉल मार्गावर लूटमार आणि जाळपोळ सुरू केली. तसेच पोलीस ठाण्याला आग लावली. या हिंसक आंदोलनात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. या घटनेत 13 पोलीस जखमी झाले आहेत.

अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे.  फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलीस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर फ्लायडच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरु आहे तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

Related Stories

अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊन?; अजित पवार म्हणाले…

Tousif Mujawar

सीमामार्गांनी देशाबाहेर पडण्याची तयारी

Patil_p

कोरोनामुळे इस्रायल पंतप्रधानांचा दौरा टळला

Patil_p

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मीटर सुरूच

Archana Banage

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 90 हजारांवर

datta jadhav
error: Content is protected !!