Tarun Bharat

अमेरिकेत 34.80 लाख कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत आतापर्यंत 34 लाख 80 हजार 059 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 38 हजार 273 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

अमेरिकेत सोमवारी 65 हजार 488 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 34.80 लाख कोरोना रूग्णांपैकी 15 लाख 50 हजार 324 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 17 लाख 91 हजार 462 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 934 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. 4 लाख 28 हजार 303 जणांना न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. तर 32 हजार 445 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कॅलिफोर्नियात 3 लाख 36 हजार 037 जणांना बाधा झाली असून, 7 हजार 096 रुग्ण दगावले आहेत. 

Related Stories

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

Archana Banage

रमजान मुबारक! मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

prashant_c

अभिनेत्री तब्बुचा अपघात; ‘भोला’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करताना दुखापत

Kalyani Amanagi

‘या’ राज्यात दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी

Patil_p

चीनने लडाखमधील सैन्य वाढवले

datta jadhav

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 21 हजारांपार

datta jadhav