Tarun Bharat

अमेरिकेत 67 वर्षानंतर प्रथमच महिलेला मृत्यूदंड

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत 67 वर्षानंतर प्रथमच आज एका महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. 

लिसा मोंटोगॉमेरी (वय 55) असे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. इंडियाना प्रांतातील कारागृहात  स्थानिक वेळेनुसार पहाटे 1 वाजून 31 मिनिटांनी तिला इंजेक्‍शन देऊन मृत्यूदंड देण्यात आला. अमेरिकेत 1953 साली एका महिलेला शेवटचा मृत्युदंड देण्यात आला होता. 

लिसा यांनी एका गर्भवती महिलेची हत्या केली होती. तसेच तिच्या पोटातील गर्भ चाकूने बाहेर काढून तो आपला असल्याचे भासवले होते.

Related Stories

चीनमधील भारतीय प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम रद्द

prashant_c

रशियाने युक्रेनवर डागली 120 क्षेपणास्त्रे

Amit Kulkarni

युद्धात अन्य देशांचे भाडोत्री सैनिक सामील

Patil_p

युक्रेनियन कुटुंबाकडून 125 किलोमीटरची पायपीट

Patil_p

लस लवकरच : बायडेन

Patil_p

लसीकरण थांबवू नका; WHO चे युरोपियन देशांना आवाहन

datta jadhav