Tarun Bharat

अमेरिकेनेपुरविले 100 व्हेंटिलेटर्स

नवी दिल्ली :

 अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी नवी दिल्ली येथे भारतीय रेडक्रॉस मुख्यालयात युनायटेड स्टेट्स एजेन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी) कडून उपलब्ध करण्यात आलेले 100 व्हेंटिलेटर्स मंगळवारी सोपविले आहेत. कोरोना विरोधात लढय़ात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनानुसार बाधितांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर्स भारताला देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर्सची पहिली खेप सोमवारी दाखल झाली आहे. हे व्हेंटिलेटर्स अत्याधुनिक स्वरुपाचे असून शिकागो येथील कंपनीने त्यांची निर्मिती केली आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी व्हेंटिलेटर्स एक महत्त्वाचे वैद्यकीय उपकरण ठरले आहे.

Related Stories

जगातील सर्वात उंच शिवप्रतिमेचे लोकार्पण

Patil_p

बूस्टर डोसची आवश्यकता निश्चित करा

Patil_p

96 देशांची भारताच्या लसीला मान्यता

Patil_p

भारत दौऱ्यावर येणार सौदीचे युवराज

Patil_p

सुंदर पिचाई आणि पंतप्रधान मोदी यांची भेट; ‘भारताच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा

Abhijeet Khandekar

देशात कोरोनाचा पाचवा बळी

tarunbharat