Tarun Bharat

अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केल्या 157 पुरातन वस्तू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अमेरिकेने 157 दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू सुपूर्द केल्या आहेत. या वस्तू भारतातीलच आहेत. परंतु, त्या तस्करी करण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू धातू, दगड, माती आणि सिरॅमिकपासून बनवलेल्या आहेत.

अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केलेल्या 157 दुर्मिळ ऐतिहासिक भारतीय कलात्मक वस्तूंमध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. 12 व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती, दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची प्रतिकं असलेली अनेक दुर्मिळ शिल्प आहेत. याशिवाय 45 कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. लक्ष्मी-नारायण, बुद्ध, विष्णू, शिव-पार्वती, 24 जैन तीर्थंकर, कनकलमूर्ती, ब्राह्मी, नंदिकेश अशा देवी-देवतांच्या ब्राँझच्या मूर्तींचाही यात समावेश आहे.

Related Stories

इंदौरमध्ये शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav

भारत-जपान यांच्यात ‘टू प्लस टू’ चर्चा

Patil_p

उत्तरप्रदेशात महिलेला फाशी देण्याची तयारी

Patil_p

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

संजय राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला- शरद पवार

Archana Banage

स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर एकत्र या; उध्दव ठाकरे यांचे आवाहन

Archana Banage