Tarun Bharat

अमेरिकेला पुरूषांच्या रिलेत सुवर्णपदक

वृत्तसंस्था/ टोकियो

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी अमेरिकेच्या पुरूष संघाचा 4ƒ400 मी. रिलेतील सुवर्णपदकासाठीचा विजनवास अखेर संपुष्टात आला. या स्पर्धेत अमेरिकेच्या पुरूष संघाने सुवर्णपदक पटकाविले.

अमेरिकेच्या पुरूष रिले संघातील मिचेल चेरी, मिचेल नॉर्मन, ब्रेसी डेडमॉन आणि राय बेंजामीन या धावपटूंनी 2 मिनिटे, 55.70 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात हॉलंडच्या धावपटूंनी 2 मिनिटे 57.18 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक आणि बोट्सवानाने कांस्यपदक मिळविले. गेल्या गुरूवारी रेयान प्रुसेरने पुरूषांच्या गोळाफेकमध्ये सुवर्णपदक मिळविताना यापूर्वीचा आपलाच ऑलिंपिक विक्रम मागे टाकला. शुक्रवार अखेरीस फिल्ड ऍन्ड ट्रक प्रकारात अमेरिकेचा प्रुसेर हा एकमेव सुवर्णपदक विजेता होता. त्यानंतर शनिवारी या क्रीडा प्रकारात अमेरिकेने दुसरे सुवर्णपदक पुरूषांच्या रिलेमध्ये पटकाविले.

Related Stories

अमेरिकेची जेनीफर ब्रॅडी अजिंक्य

Patil_p

भारताचा झिम्बाब्वे दौरा ऑगस्टमध्ये

Patil_p

अचंता शरथ कमलला ‘खेलरत्न’ सन्मान

Amit Kulkarni

ऑस्ट्रिया प्रथमच बाद फेरीत

Patil_p

मुंबईच्या विजयात कर्णधार अय्यरचे शतक, धवलचे पाच बळी

Patil_p

इंग्लंड संघाची विजयाकडे वाटचाल

Patil_p