Tarun Bharat

अमेरिकेवरही मात करणारा तालिबान

Advertisements

`Afghanistan is the graveyard of Empires’ याचा अर्थ अफगाणिस्तान साम्राज्यांची दफनभूमी आहे, असा होतो. कित्येक शतके जुनी ही म्हण प्रत्येक कालखंडात खरी ठरली आहे. सिकंदर, मुगल, इंग्रज, सोव्हियत युनियननंतर अमेरिका याचे नवे उदाहरण आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानात 61 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. 2300 हून अधिक अमेरिकेचे सैनिक मारले गेले. पण अखेरीस जागमिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले आहे. अमेरिकेला 20 वर्षांपर्यंत दमविणाऱया आणि देश सोडण्यास भाग पाडणाऱया समुहाचे नाव ‘तालिबान’ आहे.

रविवारी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजीच तालिबानने राजधानी काबूलसमवेत पूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाण सैन्य तालिबानशी तडजोड करण्यास तयार झाले आहे. अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानची राजवट येणार हे आता निश्चित आहे.  याचमुळे तालिबानचा इतिहास, काम करण्याची पद्धत, उत्पन्नाचा स्रोत जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तालिबानची कार्यपद्धत

कुठल्याही देशाच्या सरकारप्रमाणेच तालिबानचे काम सुरू असते. यात पूर्ण संघटनेचा एक प्रमुख असतो. त्यानंतर तीन उपप्रमुख नियुक्त केलेले असतात. तसेच संघटनेची एक लीडरशिप कौन्सिल असते, ज्याला रहबरी शूरा म्हटले जाते. त्यानंतर विविध विभागांचे आयोग असतात. सर्व प्रांतांसाठी वेगवेगळा गव्हर्नर आणि कमांडरची देखील नियुक्ती केली जाते.

तालिबान अन् वित्तीय पाठबळ

तालिबान स्वतःच्या उत्पन्न अन् खर्चाचा तपशील कधीच प्रसिद्ध करत नाही. याचमुळे त्याचे अचूक उत्पन्न आणि मालमत्तेचा थांगपत्ता लावणे अवघड आहे. 2016 मध्ये फोर्ब्स नियतकालिकाने व्यक्त केलेल्या अनुमानानुसार तालिबानची वार्षिक उलाढाल 2,968 कोटी रुपये इतकी आहे. रेडिओ फ्री युरोपकडून प्राप्त नाटोच्या गोपनीय अहवालानुसार 2019-20 मध्ये तालिबानचे वार्षिक बजेट सुमारे 11 हजार कोटी रुपयांचे होते.

तालिबान म्हणजे कोण?

1980 च्या दशकात अफगाणिस्तानात सोव्हियत युनियनच्या सैन्याच्या संरक्षणातच अफगाण सरकार टिकले होते. अनेक मुजाहिदीन गट याविरोधात लढत होते. 1989 पर्यंत सोव्हियत युनियनने स्वतःचे सैन्य मागे घेतले. त्यानंतर मुजाहिदीनांचे गट परस्परांमध्येच लढू लागले. असाच एक गट मुल्ला मोहम्मद उमरचा होता. त्याने काही पश्तून युवकांसोबत मिळून तालिबान आंदोलन सुरू केले.

Related Stories

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी ‘E-emergency X-Misc visa’

datta jadhav

सोलोमन बेटांवर आढळला बालकाच्या आकाराचा बेडूक

Patil_p

कैदी नसल्याने तुरुंगांचे आलिशान हॉटेलात रुपांतर

Patil_p

कठुआ : पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन पाडले

datta jadhav

एक डोसच्या लसीद्वारेही अँटीबॉडीची निर्मिती

Patil_p

श्रीलंकेत राजपक्षे बंधूंची बाजी; पंतप्रधान कोण?

datta jadhav
error: Content is protected !!