Tarun Bharat

अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट ; दिला ‘हा’ सल्ला


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र तरी समर्थकांच्या राजीनाम्यांमुळे अद्यापही चर्चा सुरुच आहे. पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर धर्मयुद्ध टाळण्याचा शक्यतोवर प्रयत्न करीत असल्याचा सूचक इशारा देत पंकजा मुंडे यांनी माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी एक सल्ला दिला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांना नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका. अमोल मिटकरी यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, अशी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून पंकजा मुंडे म्हणाल्या, मला दबावतंत्र करायचे नाही. मी संघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडून अत्यंत सन्मानाची वागणूक मिळाली. कार्यकर्त्यांची नाराजी दूर कराल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो.

Related Stories

संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे- आशिष शेलार

Archana Banage

शेअर बाजारात आज एक तास मुहूर्त ट्रेडिंग

datta jadhav

रत्नागिरी जिल्ह्यात 4 नवे रुग्ण,बाधितांची संख्या 86 वर

Archana Banage

सत्ताधारी महेश शिंदे यांचे जंगी स्वागत

Patil_p

रामराजे अन् उदयनराजे यांची पुण्यात खाजगी कार्यक्रमात भेट

Patil_p

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आठ पदरी करा -अजित पवारांची मागणी

Abhijeet Khandekar