Tarun Bharat

अयोध्या : राममंदिराच्या 2 हजार फूट खाली ठेवणार ‘टाइम कॅप्सूल’

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

अयोध्येतील राममंदिराची उभारणी करताना मंदिराच्या खाली 2 हजार फूट ‘टाइम कॅप्सूल’ म्हणजेच वर्तमानकाळातील महत्वाच्या घटनांची नोंद असलेली काही कागदपत्रे आणि वस्तू एका कुपीत ठेवून ती पुरण्यात येणार आहेत. भावी पिढीला उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

चौपाल म्हणाले, भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्याला केवळ यामागचे तथ्य समजावे हा या टाइम कॅप्सूलचा हेतू आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यादृष्टीने अयोध्येत तयारीला वेग आला आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे.

दरम्यान, राममंदिराच्या मूळ आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. मंदिराची उंची 128 फुटांवरून 161 फुटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन मजल्यांचे हे मंदिर असेल. मंदिरासाठी 2.77 एकर जमीन लागणार आहे. मंदिरावर तीन ऐवजी पाच कळस असणार आहेत. 

Related Stories

‘यूएईत’ होणार आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम

Archana Banage

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

Archana Banage

काश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवाद्यांनी केला बॉम्ब हल्ला; 8 जण जखमी

Tousif Mujawar

‘नोटा’संबंधी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

Patil_p

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी

Archana Banage

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाकरे सरकारची ‘ही’ खास भेट

Tousif Mujawar