Tarun Bharat

अयोध्येतील मशिदीला बाबरचे नाव नसणार

अयोध्या

 अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ानंतर मंदिर उभारणीचे काम सुरू झाले आहे. तत्पूर्वी सुन्नी मध्यवर्ती वक्फ मंडळाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीसाठी 5 एकर जमीन यापूर्वीच हस्तांतरित करण्यात आली आहे. सुन्नी वक्फ मंडळाकडून स्थापन इस्लामिक कल्चरल फौंडेशनने अयोध्येत बाबरच्या नावावर कुठल्याही मशिदीची किंवा रुग्णालयाची निर्मिती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 5 एकर जमिनीवर रुग्णालय, संशोधन केंद्र आणि पुस्तकालय निर्माण केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

5 एकर जमिनीवर बाबरी रुग्णालय उभारले जाणार असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरविली जात असल्याचेही फौंडेशनने म्हटले आहे. अयोध्येच्या धन्नीपूर गावात मशिदीसाठी जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी विभागाची जमीन मशिदीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.

Related Stories

हिमाचल प्रदेशात ‘आप’ला मोठा झटका

Archana Banage

लसीकरणाची वयोमर्यादा काढून टाकण्याची मागणी

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून जलद सुनावणीची योजना

Patil_p

तेजबहादुरची याचिका फेटाळली

Patil_p

दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा 39 वर, 136 दंगेखोर अटकेत

tarunbharat

कोरोना काळात आत्महत्या करणाऱ्या उद्योजकांची आकडेवारी धक्कादायक

Archana Banage