Tarun Bharat

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 1,11,111 ची देणगी

प्रतिनिधी  / बेळगाव

‘अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी मला निधी द्यावयाचा आहे. मी वयस्कर आहे. कृपया येऊन निधी घेऊन जा’, असे सांगत अशोकनगर येथील मुदकाप्पा बशेट्टी यांनी रविवारी 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिर निर्माण समितीच्या कार्यकर्त्यांना दिला. बशेट्टी यांची रामभक्ती पाहून आणि त्यांनी दिलेला भरघोस निधी स्वीकारताना कार्यकर्त्यांना गहिवरून आले. रविवारी मंदिर निर्माण समितीचे मुख्य कार्यकर्ते व विहिंपचे कर्नाटक उत्तर प्रांताचे सहकोषाध्यक्ष कृष्णा भट यांच्याकडे बशेट्टी यांनी आपली नात श्राव्या हिच्या हस्ते हा धनादेश दिला. याप्रसंगी बसू मुरगोडी, निखिल कोळेकर आणि अरुण गौडा उपस्थित होते.

Related Stories

सांडपाण्याची विल्हेवाट लावा, अन्यथा मोर्चा

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवडणुकीत नवे विघ्न

Amit Kulkarni

काँग्रेसच्या अपप्रचाराविरुध्द भाजपची मोहीम

Patil_p

शुभम शेळके यांच्या प्रचारात खानापूर म.ए.समितीचा सहभाग

Amit Kulkarni

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱयामुळे भारताचे आर्थिक नुकसान – सीताराम येचुरी यांचा दावा

tarunbharat

निवडणुकीसाठी सीमा हद्दीवर पोलीस बंदोबस्त

Patil_p