Tarun Bharat

अयोध्येत तयार होतेय श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती

Advertisements

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

अयोध्येत भगवान श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती बनवण्याचे काम सुरू झाले आहे. 251 मीटर उंचीची ही मूर्ती असणार आहे. ही मूर्ती तयार करण्याचे काम देशातील सर्वश्रेष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आले आहे. 

श्रीरामांची मूर्ती पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असावी, असा  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न आहे. मूर्तिकार राम सुतार हे 94 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा अनिल सुतार त्यांना या कामात मदत करणार आहे. ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असेल आणि ती उत्तरप्रदेशातच तयार होईल, असे सुतार यांनी म्हटले आहे. मुुर्ती तयार करण्यासाठी साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे काम राम सुतार यांनीच केले आहे. तेथील सरदार वल्‍लभभाई पटेल यांचा पुतळा 183 मीटरचा आहे. मूर्तिकार राम सुतार हे मूळचे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील आहेत. दिल्लीतील नोएडा येथे त्यांचे एक स्टुडिओ आहे. त्यांनी आतापर्यंत 15 हजारांपेक्षा अधिक मूर्ती बनविल्या आहेत.

Related Stories

तटरक्षक दलाचा 45 वर्धापन दिन उत्साहात

Patil_p

धोका वाढला : जम्मू काश्मीरमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 61 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

मला गाडीने नको, विमानाने न्या; नाहीतर…

datta jadhav

‘काँग्रेसला स्वबळावर लढायचंय तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?’

Archana Banage

पोलीस विभागाचा ‘स्मार्ट पोलिसिंग’ उपक्रम उपयुक्त : अजित पवार

Tousif Mujawar

पंजाबमध्ये मागील 24 तासात 8,014 नवे कोरोना रुग्ण; 182 मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!