Tarun Bharat

अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर सोनू सूद म्हणाला ….


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि गरीबांचा ‘मसीहा’ सोनू सूद शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यी भेट घेतवली. मात्र या भेटीमागे अनेक राजकीय तर्क लढवले जात आहे. आगामी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनू सूद केजरीवाल यांना भेटल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या आहे. पत्रकार परिषदेत सोनूला राजकारणात प्रवेश करण्याबद्दल आणि आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले, यावेळी त्याने चतुराईने उत्तरे दिली. तसेच या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट देखील केले.

आगामी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर यावेळी सोनू सूदला प्रश्न विचारण्यात आला. तर तो म्हणाला, आता अशी कोणतीही योजना नाही. पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या प्रचाराच्या प्रश्नावर सोनू म्हणाले की, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. जो चांगले काम करेल, त्याच्या मागे आम्ही असू, बऱ्याच काळापासून राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत, असे देखील त्याने सांगितले.तसेच केजरीवाल यांनी मुलांसाठी ‘देश के मेंटोर’ कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आणि सोनू सूद या कार्यक्रमाचा आमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याची घोषणा देखील यावेळी केली.तसेच सोनू सूदने या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. तो पुढे म्हणाला की, त्यापेक्षा मोठा मुद्दा आहे ‘देश के मेंटोर’ कार्यक्रमा संदर्भात. मला वाटते यापेक्षा मोठा मुद्दा असू शकत नाही. तो म्हणाला, “Nothing पॉलिटिकल.. मी नेहमीच हे सांगत आलो आहे. लोक नेहमी म्हणतात की तुम्हाला काही चांगले काम करायचे असेल तर राजकारणात या, हे एक अद्भुत क्षेत्र आहे. परंतु आम्ही अद्याप कोणत्याही राजकारणावर चर्चा केलेली नाही कारण मला वाटते की हा मुद्दा त्यापेक्षा मोठा आहे.

Related Stories

”छगन भुजबळांचे आंदोलन म्हणजे ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न”

Archana Banage

गुणवत्तेसोबत आरक्षणही आवश्यक

Amit Kulkarni

आज ‘रेल रोको’ आंदोलनाची हाक

Patil_p

शेमारू मराठीबाणाला एक वर्ष पूर्ण

Patil_p

नव्या कृषी कायद्यांविरोधात जनक्षोभ

Patil_p

‘बॅक टू स्कूल’

Patil_p