Tarun Bharat

अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Advertisements

माडखोल धवडकी शाळा नं. २ चे प्रयोग व उपक्रमशील शिक्षक

ओटवणे / प्रतिनिधी:

     माडखोल धवडकी शाळा नं. २ चे प्रयोग व उपक्रमशील शिक्षक अरविंद नारायण सरनोबत याना कोल्हापूर येथील अविष्कार सामाजिक व शैक्षणिक फाऊंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या ५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. अविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आदर्शवत शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव करण्यात येतो. अरविंद सरनोबत यांनी आपल्या एकोणीस वर्षाच्या शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय व गौरवास्पद कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास विकासासाठी त्यांनी शाळेमध्ये गुणात्मक व वैशिष्ट्यपूर्ण असे चौफेर उपक्रम राबवविले. त्यांच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.         अरविंद सरनोबत यांनी कास शाळा नं १, आंबेगाव शाळा नं १, ओटवणे शाळा नं १, माडखोल धवडकी शाळा नं. २ या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करतांना त्यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग ते राज्यस्तरापर्यंत विविध क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्काऊट गाईड, परसबाग, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा स्पर्धा, परीक्षा नवोपक्रम, सहशालेय उपक्रम, नृत्य व गायन वादन, संगीत शिक्षक, स्वच्छता अभियान, आकाशवाणी वरील फोन इन कार्यक्रम आदी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले आहे. धवडकी शाळा नं २ सावंतवाडी तालुक्यात पहिली आय एस ओ शाळा करण्यात त्यांचेही महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Related Stories

लोकमान्य मल्टीपर्पजकडून पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांचा सत्कार

Anuja Kudatarkar

गुहागरचे कोविड केअर सेंटर दापोलीत

Patil_p

सत्ताधाऱयांकडून जिल्हय़ाला मागे नेण्याचे काम!

NIKHIL_N

पूर्वराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या 12 जणांची निवड

NIKHIL_N

मसुरे येथील कुक्कुटपालन शिबिराला प्रतिसाद

NIKHIL_N

Ratnagiri Crime News : तिघांनी मिळून वृध्दाला 2 लाख 66 हजार घातला गंडा

Archana Banage
error: Content is protected !!