बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेख हिट तमिळ चित्रपट ‘अरुवी’च्या हिंदी रिमेकवरून चर्चेत होती. पण आता फातिमा ही ई. निवास यांच्या चित्रपटातून बाहेर पडल्याचे वृत्त आहे.
दंगल गर्ल अभिनेत्री फातिमाला या चित्रपटाच्या चित्रिकरणावरून काही समस्यांना तेंड द्यावे लागत होते. या चित्रपटाचे चित्रिकरण ऑगस्टमध्ये सुरू होणार होते. पण विलंब झाल्याने ते नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात येणार होते. चित्रपटाला विलंब झाल्याने फातिमाने अन्य चित्रपटांच्या कामाला सुरुवात केली आहे.


दिग्दर्शक ई. निवास यांनी फातिमाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अभिनेत्रीने भविष्यात अन्य चित्रपटाकरता सोबत काम करू असे सांगितले आहे. फातिमाने या चित्रपटातील स्वतःच्या भूमिकेसाठी तयारीही सुरू केली होती. ई. निवास यांच्यासोबत तिने पटकथेचे वाचनही सुरू केले होते.
फातिमाने ‘चाची 420’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण तिला खरी ओळख दंगल चित्रपटामुळे प्राप्त झाली. अलिकडेच अभिनेत्रीला ‘लूडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ चित्रपटात पाहिले गेले होते.