Tarun Bharat

अरे भावा, मी भाजपचा नाही, काँग्रेसचा आहे – राहुल गांधी

पणजी/प्रतिनिधी

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Legislative Assembly election) रिंगणात तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress) आणि आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) उडी घेतली आहे. दरम्यान, गोवा निवडणुकीसाठी काही महिने बाकी असल्याने अनेक राजकीय नेत्यांचे गोवा दौरे सध्या सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee Chief Minister of West Bengal) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असतांना आता राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील गोवा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी आज वेल्सोओ इथे मच्छिमार बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थित बहुतांश मच्छिमार बांधव हे कोकणी भाषेत प्रश्न विचारत होते. त्याचे भाषांतर करुन राहुल गांधी यांनी सांगितलं जात होते आणि त्यानंतर राहुल गांधी हे या समस्येवर मत व्यक्त करत होते.

राहुल गांधी यांचा संवादाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी एका मच्छिमार बांधवाने इंग्रजीतून प्रश्न विचारत पेट्रोल महाग झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. एवढे महाग पेट्रोल मच्छिमार बोटीसाठी परवडत नाही असं सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्या मच्छिमार बांधवाचे बोलणे मध्येच थांबवत राहुल गांधी यांनी “अरे भावा, मला आशा आहे की तुला माहित असेल, मी भाजपचा (BJP) नाहीये, मी काँग्रेसचा (Congress) आहे “. असं वक्तव्य केल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावर ती व्यक्ती म्हणाली “आश्वासन दिल्यावर तुम्ही उद्या सत्तेत आल्यावर असं वागू नका. हे मी आत्ताच सांगतो”. तेव्हा मग राहुल गांधी यांनी २०१४ ला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑइलचे दर जास्त होते, तरीही इंधनाचे दर कसे कमी होते. आता क्रुड ऑईलचे दर कमी असून सुद्धा इंधनाचे दर कसे जास्त आहेत हे स्पष्ट केलं. तसेच इंधनाच्या वाढलेल्या दरांबाबत आम्हाला दोष देऊ नका असंही संबंधिताला सांगितलं.

Related Stories

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीचे 6 राज्यात छापे

Patil_p

उमर खालिद विरोधात अभियोग चालविण्यास अनुमती

Patil_p

भारतातही लवकरच ई-पासपोर्ट सुविधा

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखांवर

datta jadhav

अकोल्यात 15 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 1121

Tousif Mujawar

वीजबील दुरुस्ती नाही, तर बील भरणार नाही

Abhijeet Khandekar