Tarun Bharat

अर्जेंटिनाच्या जीडीपीत घसरण

यापूर्वी 2002 मध्ये अशी स्थिती झाल्याची नोंद

वृत्तसंस्था / अर्जेंटिना

कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊनच्या घोषणेमुळे चालू वर्षातील दुसऱया तिमाहीत (एप्रिल ते जून) अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेने विक्रमी म्हणजे तब्बल 19.1 टक्क्मयांची घसरण नोंदवली आहे. विश्लेषकांनी येत्या काळातही हा घसरणीचा आलेख राहण्याची भीती व्यक्त केली आहे. सदरची स्थिती ही यापूर्वी 2002 च्या संकटाच्या काळात राहिली होती. तेक्हा जवळपास जीडीपी 16.3 टक्क्मयांनी प्रभावीत राहिल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या संकटाच्या प्रभावाने दक्षिण अमेरिकेतील देशांनी 20 मार्चपासून ऑगस्टपर्यंत सक्तीचे लॉकडाऊन पुकारले होते. यामध्ये सध्या काही प्रमाणात सवलत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु काही नियम हे ऑक्टोबरपर्यंत लागू केले जाणार असल्याची माहिती आहे.

सध्या अर्जेंटिनामध्ये 6,40,000 पेक्षा अधिकजण कोरोना विषाणूने संसर्गग्रस्त झाले आहेत. तसेच यातील 13,500 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रमुख अन्नधान्यांची उत्पादने घेणाऱया देशांमध्ये 2018 पासूनच मंदीचे वारे सुरु आहे. देशातील फॉरेक्स रिझर्व्हमधील सलगची होत असणारी स्थिती आणि अन्य बाबींचाही अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव राहिल्याची नोंद यावेळी करण्यात आली आहे.

Related Stories

पीव्हीआर-आयनॉक्स विलीनीकरणाला एनसीएलटीची मान्यता

Patil_p

विक्रीच्या प्रभावामुळे सेन्सेक्सची पडझड

Patil_p

कार्यालयीन गाळय़ांची मागणी घटली

Amit Kulkarni

आयटीआर फाईलची तारीख वाढण्याचे संकेत

Patil_p

खादी आउटलेटमधून 1.2 कोटींची कमाई

Patil_p

गव्हाची 34,917 टनाची खरेदी

Patil_p
error: Content is protected !!