Tarun Bharat

अर्जेंटिना : गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंतांवर अतिरिक्त टॅक्स

ऑनलाईन टीम / ब्यूनस आयर्स :

कोरोना संकटात गरिबांच्या मदतीसाठी श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींवर अतिरिक्त टॅक्स लावण्याचा निर्णय अर्जेंटीनाने घेतला आहे. अर्जेंटीनाच्या सिनेटमध्ये नव्या टॅक्सबाबतच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. 

अर्जेंटिनात 17.7 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या लोकांना हा टॅक्स आकारण्यात येणार आहे. या देशात अशा लोकांची संख्या जवळपास 12 हजार आहे. कोरोना संकटामुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेला अतिरिक्त भार पेलण्यासाठी आणि गरिबांच्या मदतीसाठी हा टॅक्स आकारला जाणार आहे. तो टॅक्स एकदाच घेतला जाईल. 

कोरोना संकटामुळे इतर देशांप्रमाणे अर्जेंटिनालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या विधेयकानुसार श्रीमंतांना त्यांच्या संपत्तीच्या एक ते तीन टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. त्यांनी परदेशात ठेवलेल्या धनावरही 50 टक्के सरचार्ज आकारण्यात येणार आहे.

Related Stories

महिनाभर टाळेबंदी

Patil_p

कोरोना मुकाबल्यासाठी पाकिस्तान घेणार 150 कोटी डॉलर्सचे कर्ज

datta jadhav

बेडरुममधून जाते 2 देशांची सीमा

Patil_p

दरदिनी 20 अब्ज डॉलर्सचा होतोय खर्च

Patil_p

सोफा-बेंच अन् टायरने करतो वर्कआउट

Patil_p

रशियाकडून आणखी काही शहरांवर ताबा

Patil_p